
मोहक, सुखकर आणि आनंदी जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आनंद. संधीचा फायदा घेऊन यश मिळवता येते आणि त्यामुळे आनंद मिळतो.
आपल्या आयुष्यात कुठेतरी चांगल्या संधी येतात पण आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकत नाही, कारण आपण त्यासाठी तयार नसतो आणि सतर्क नसतो. अपेक्षेप्रमाणे संधी येत नाही आणि ती निघून गेल्यावर लक्षात येते की ती संधी हुकली आहे. आपण सतत सजग, सक्रिय आणि मेहनती असले पाहिजे, तरच आपण शुभ संधींचा लाभ घेऊ शकतो. संधींचा फायदा घेऊन त्यांचे यशात रूपांतर करणे आणि त्यामुळे आनंदी होणे हे क्रम:प्राप्त आहे. आपल्यामध्ये नेहमीच संतुलन असायला हवे, जागरूकता असली पाहिजे जेणेकरून आपण निष्काळजी राहू नये किंवा चुका करू नये. आपली चेतना कोणत्या क्षणी काय स्वीकारेल हे सांगता येत नाही, प्रत्येक क्षण अनमोल आहे कारण गेलेला क्षण परत येत नाही. यशाचे रहस्य? यशासाठी कुठलं रहस्य आहे, याच सगळ्यांना कोड पडत , पण यश संपादन करण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करणे म्हणजेच यश प्राप्ती होय. बऱ्याच वेळा असे घडते की आपल्याला असे वाटते की, संधी निघून गेली आहे.पण ही एक संधी आहे हे कसं कळेल? कारण तुम्हाला कळेल तेव्हा संधी निघून जाते,म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणी सतर्क राहा, संधी मिळताच ती व्यर्थ जाऊ देऊ नका, सदैव सतर्क राहा आणि मग संधी कशी चुकणार. संधीचा पुरेपूर फायदा घेतल्यास यश पायाशी लोळण घेणारच.